तो माझा मेव्हणा नाही… माझ्या बँकेवर डंके की चोट पे म्हणत गुणरत्न सदावर्ते भडकले
बँकेत असलेल्या ठेवींच्या व्याजपेक्षा कमी दरानं कर्ज, यासह अनेक आर्थिक घोटाळे बँकेत झाले आहेत. त्यामुळे या प्रकारांची चौकशी करण्यात येईल असे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. दरम्यान या संदर्भात अनिल परब यांनीही प्रश्न उपस्थित केला. यावर सदावर्ते यांनी सरकारवर टीका केली
मुंबई, १२ डिसेंबर २०२३ : एसटी बँकेच्या कारभाराचा मुद्दा हिवाळी अधिवेशनातील सभागृहात उपस्थित झाला. सरकारनेही विरोधकांच्या आरोपांची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. बँकेत असलेल्या ठेवींच्या व्याजपेक्षा कमी दरानं कर्ज, यासह अनेक आर्थिक घोटाळे बँकेत झाले आहेत. त्यामुळे या प्रकारांची चौकशी करण्यात येईल असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत जाहीर केले. दरम्यान या संदर्भात अनिल परब यांनीही प्रश्न उपस्थित केला. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारवर टीका केली. सदावर्ते यांनी स्वतःच्या अनुनभवी २३ वर्षांच्या मेहुण्याला बँक व्यवस्थापक म्हणून नेमणं, तज्ञ संचालक म्हणून स्वतः सदावर्ते, त्यांची पत्नी जयश्री पाटलांची नियुक्ती असे आरोप झालेत. यावर सदावर्ते म्हणाले, तो माझा मेहुणा नाही. अनिल परब यांनी खोटी माहिती सभागृहाला दिली. यासाठी योग्य ती कारवाई परब यांच्यावर होणार असा इशाराही त्यांनी दिला.