Rajesh Tope | जिनोमिक सिक्वेन्स लॅबमध्ये वाढ करणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
सध्या अशा तीन संस्था असून पुढील काळात नागपूर आणि औरंगाबाद येथे करणाऱ्या जिनोमिक सिक्वेन्स अस्तित्वात येणार आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टास्क फोर्सची आज बैठक होणार असून या बैठकीत ओमिक्रॉन संदर्भात चर्चा होणार आहे.
जालना : ओमिक्रॉनच्या रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य विभागाकडून जिनोमिक सिक्वेन्स करणाऱ्या लॅबमध्ये वाढ करण्याचा विचार केला जातोय. सध्या अशा तीन संस्था असून पुढील काळात नागपूर आणि औरंगाबाद येथे करणाऱ्या जिनोमिक सिक्वेन्स अस्तित्वात येणार आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टास्क फोर्सची आज बैठक होणार असून या बैठकीत ओमिक्रॉन संदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता, लहान मुलांना लस देण्यासाठी आणि बूस्टर लसीसाठी केंद्र सरकारकडे आग्रह करण्यासंदर्भात या टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Latest Videos