Santosh Deshmukh Case : 'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या', अजितदादांच्या 'या' आमदारांची आग्रही मागणी

Santosh Deshmukh Case : ‘धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या’, अजितदादांच्या ‘या’ आमदारांची आग्रही मागणी

| Updated on: Jan 03, 2025 | 5:39 PM

आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाऊ लागू नये आणि त्याचबरोबर ही एकाधिकारशाही मोडीत काढण्यात यावी अशी मागणी मराठवाड्यातील दादांच्या आमदारांनी केली असल्याची माहिती मिळतये.

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या मराठवाड्यामधील राष्ट्रवादीचे आमदारांनी अजित पवारांकडे ही मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मराठवाड्यामधील राष्ट्रवादीचे आमदार राजीनामासाठी आग्रही आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वाल्मिक कराडशी असलेल्या जवळीकमुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते. आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाऊ लागू नये आणि त्याचबरोबर ही एकाधिकारशाही मोडीत काढण्यात यावी अशी मागणी मराठवाड्यातील दादांच्या आमदारांनी केली असल्याची माहिती मिळतये. तर तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी याआधी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली होती. ‘वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे निकटवर्ती आहेत. पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपीला शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाहून दूर व्हावं नाहीतर सीएसटीने त्यांना काढावं’, असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं होतं. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता दादांच्या मराठवाड्यातील आमदारांनी केलीये. दरम्यान, बाबासाहेब पाटील, त्यानंतर संजय बनसोडे, यासह आमदार राजू नावघरे, राजेश विटेकर आणि प्रकाश सोळंके हे मराठवाड्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

Published on: Jan 03, 2025 05:39 PM