2 हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयावर छोटा पुढारी घनश्याम दरोडे यानं स्पष्टच सांगितलं, 2024 मध्ये...

2 हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयावर छोटा पुढारी घनश्याम दरोडे यानं स्पष्टच सांगितलं, 2024 मध्ये…

| Updated on: May 20, 2023 | 3:51 PM

VIDEO | छोटा पुढारी घनश्याम दराडे यांनं 2 हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयावर काय केली टीका?

परभणी :  केंद्राने 2 हजाराची नोट बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णय सामान्यांना रडू येत नाही आणि हसूही येत नाही. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. कारण सामान्यांकडे दोन हजाराची नोटच नव्हती, अशी प्रतिक्रिया छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी केंद्र सरकारच्या नोट बंदीच्या निर्णयावर दिली. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी स्वागतच केले आहे. पुढे त्यांनं असंही म्हटलं की, नोटबंदीमुळे 2024 मध्ये निवडणूक लढणाऱ्यांना झटका लागणार आहे. सरकारने 2 हजार ऐवजी दुसरी नोट चलनात आणावी. आर्थिक स्थिती मंद होईल असं काही पाऊल सरकारने उचलू नये, 2 हजार ऐवजी सरकारने परत 1 हजाराची नोट काढावी. 2 हजाराची नोट ठरावीक जनतेसाठी होती. केंद्र सरकारचा हा निर्णय चांगला आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. सरकारने नोटेकडे ध्यान न देता विकासाकडे ध्यान दिला पाहिजे, असं सांगतानाच माझ्याकडे दोन हजाराची एकही नोट नाही, आपल्याकडे केवळ एक बोट आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

Published on: May 20, 2023 03:51 PM