अहमदनगरमधील घारगाव पोलिसांना एकल घाटात बिबट्याचं दर्शन, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
पुणे-नाशिक महामार्गावरील एकल घाटातील परिसरात रात्रीची गस्त घालणाऱ्या घारगाव पोलीसांना बिबट्याचे दर्शन झाले. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी बिबटयाच्या हालचाली मोबाईल कँमे-यात कैद केल्या असून नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
अहमदनगर: पुणे-नाशिक महामार्गावरील एकल घाटातील परिसरात रात्रीची गस्त घालणाऱ्या घारगाव पोलीसांना बिबट्याचे दर्शन झाले. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी बिबटयाच्या हालचाली मोबाईल कँमे-यात कैद केल्या असून नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. 10 सप्टेंबर रोजी शुक्रवारी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास ही घटना घडलीय.
घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावांसह वाड्या – वस्त्यांवर रात्रीच्या वेळी चोऱ्या होवू नये म्हणून घारगाव पोलीस गस्त घालत असतात.पोलीस कॉन्सटेबल किशोर लाड, चालक संतोष फड, होमगार्ड मोहमद सय्यद हे वाहनातून परिसरात गस्त घालत असताना मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास जुन्या माहुली येथील एकल घाटातून जात होते.रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट कठड्यावर बिबट्या निवांत बसलेला दिसून आला.बिबट्याला पाहून हे सर्व जण थांबले बराच वेळ झाला तरी बिबट्या तेथून हटायला तयार नव्हता.यावेळी हे सर्व दृष्य पोलीस कॉन्सटेबल किशोर लाड यांनी आपल्या मोबाईल कॅमेर्यात टिपले पठारभागात जंगली श्वापदांचा संचार वाढला असून शेतकर्यांनी रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडत असताना हातात काठी, बॅटरी इत्यादी अत्यावश्यक साहित्यांचा वापर करावा असे आवाहनही पोलीसांनी केलय.