Ghatkopar Crane Accident : घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्…
घाटकोपरमधील पंत नगर परिसरात एक क्रेन कोसळली आहे. यामुळे घाटकोपरवरुन ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही क्रेन कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय
मुंबईतील घाटकोपरमधील पंत नगर परिसरात एक क्रेन कोसळल्याची घटना सकाळी घडल्याचे समोर आले आहे. यामुळे घाटकोपरवरुन ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही क्रेन कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. पूर्व द्रुतगती मार्गावर एक क्रेन पहाटेच्या सुमारास कोसळली असून या घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अलिबाग वरून भांडुपच्या दिशेने एक ट्रेलरवरून पूर्वदृतगती मार्गाने ही क्रेन भांडुपच्या दिशेने निघाली होती. यादरम्यान घाटकोपरचा ब्रिज उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन खाली रस्त्यावर कोसळली. या खाली एक दुचाकीस्वार आला असून यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घाटकोपर ब्रिज वाहतुकीसाठी गेले सहा तास बंद होता. यादरम्यान, वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू ठेवण्यात आली होती. या अपघातामुळे सध्या घाटकोपरवरुन ठाण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.