राजकीय पक्षात मतभेद असतात, पण, काही पथ्य पाळली पाहिजेत; गिरीश बापटांचा नारायण राणेंना घरचा आहेर?
भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना नारायण राणेंना घरचा आहेर दिला. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत.
भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना नारायण राणेंना घरचा आहेर दिला. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत. त्यात सर्वच पक्ष आहेत. त्यात मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे, असं बापट म्हणाले. सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना पाथ्य पाळायला हवं. तसेच सामान्य जनतेला जे आवडतं ते केलं पाहिजे. जनतेत जाऊन कामं केली पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
Latest Videos