एकसदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपचा विरोध, गिरीश बापट यांची माहिती
गिरीश बापट यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध केला. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे, असं ते म्हणाले.
गिरीश बापट यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध केला. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा राज्य सरकारचा निर्णय आहे, कॅबिनेट काय निर्णय घेते ते बघू, असं बापट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना नारायण राणेंना घरचा आहेर दिला. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत. त्यात सर्वच पक्ष आहेत. त्यात मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे, असं बापट म्हणाले.