'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही', भाजपचा बडा नेता काय म्हणाला?

‘आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही’, भाजपचा बडा नेता काय म्हणाला?

| Updated on: Jan 02, 2025 | 3:21 PM

कोकणातील उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या चर्चांवर राजन साळवी यांनीच पत्रकार परिषद घेत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे.

कोकणातील उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या चर्चांवर राजन साळवी यांनीच पत्रकार परिषद घेत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. “मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याची मोठी खंत, वेदना मला आणि मतदारसंघातील माझ्या जनतेला आहेत. मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतंय”, असं राजन साळवी म्हणाले. दरम्यान, यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. आमच्यासोबत या असं आम्ही राजन साळवींना म्हणालो नाही असं स्पष्टपणे गिरीश महाजनांनी म्हटलं. तर आमच्याकडे आता गर्दी आहे जागाच नाही असं वक्तव्यही गिरीश महाजनांनी केलंय. ‘आम्ही कुठे म्हटलं ते आमच्याकडे येत आहेत म्हणून. आमच्याकडे आता एवढी गर्दी आहे, आमच्याकडे आता आम्ही घ्यायचं कोणाला? हा प्रश्न आमच्यापुढे आहे. आम्ही कुठे त्यांना म्हटलंय चर्चा कोणी करत असेल तर त्यांनाच विचारा पण आम्ही राजन साळवींना म्हटलं नाही भाजपमध्ये या म्हणून आणि आमच्याकडे अशी तेवढी जागा पण नाही’, असं गिरीश महाजन म्हणाले.

Published on: Jan 02, 2025 03:21 PM