पवार घरातील वादाला कंटाळून लोकांनी राष्ट्रवादी सोडली, कुणी केली खोचक टीका?
VIDEO | 'ज्या शिवसेनेसोबत सत्तेमध्ये असताना शिवसेनेचे एकेकाळी शिलेदार छगन भुजबळ, गणेश नाईक हे बाळासाहेबांचे जवळचे होते, त्यांना कोणी फोडलं?', राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी सवाल करत दिले प्रत्युत्तर
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | भ्रष्टाचारात गुंतलेल्या नेत्यांची उदाहरणे भरपूर आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते स्वच्छ झाले आहेत. त्यामुळे भाजपनं आपले निवडणूक चिन्ह कमळ बदलून वॉशिंग मशीन ठेवले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी असे भाष्य केले होते. यावर भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा पक्षाला निवडणूक चिन्ह वॉशिंग मशीन द्या, असे शरद पवार यांनी म्हटले तर भाजप हा फोडाफोडी करणारा पक्ष, अशी टीका शरद पवार यांनी केली. यावर गिरीश महाजन म्हणाले, शरद पवार तुम्हीही मुख्यमंत्री होता तो काळ एकदा मागे वळून पाहायला हवा. ज्या शिवसेनेसोबत तुम्ही सत्तेमध्ये सहभागी होता. त्यावेळी शिवसेनेचे एकेकाळी शिलेदार छगन भुजबळ, गणेश नाईक हे बाळासाहेबांचे जवळचे होते. त्यांना कोणी फोडलं? गोपीनाथ मुंडेंच घर, गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे यांना कोणी फोडलं? असा सवालही त्यांनी केला तर तुमच्या घरातील परिवार वादाला कंटाळून लोकांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला, असल्याची खोचक टीकाही महाजनांनी केली.