मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? गिरीश महाजनांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, यासंदर्भातील सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील त्याचे अधिकार आम्हाला नाहीत. पण भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहेत.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
| Updated on: Sep 17, 2024 | 5:26 PM

राज्यातील राजकीय वर्तुळात पुढचा राज्यातील मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? याची चांगलीच चर्चा रंगतेय. अशातच भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर भाष्य केले आहे. ‘भाजपात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकच आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा… भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहेत. यासंदर्भातील सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील त्याचे अधिकार आम्हाला नाहीत. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत.’, असे स्पष्टपणे गिरीश महाजन यांनी सांगितले. दरम्यान, महामंडळ वाटपात शिंदे यांच्या गटाला प्राधान्य दिले गेले आहे. याबद्दल ते म्हणाले की हा विषय पक्षश्रेष्ठी बघतात मला वाटतं देवेंद्रजींना हा विषय माहीत असेल. भरत गोगावले यांना संधी मिळालेली नाही. याबाबत ते म्हणाले की बरोबर आहे, येत्या पंधरा – वीस दिवसात आचारसंहिता लागणार आहे मंत्रीपद मिळून करणार काय, पुढच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा शपथविधी घेतील असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Follow us
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.