‘एका धोबीला मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी?’, चर्चगेट वसतीगृहातील प्रकरणाबाबत चित्रा वाघ भडकल्या
VIDEO | चर्चगेट वसतीगृहातील मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करणार, चित्रा वाघ यांचा शब्द
मुंबई : चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हॉस्टेलमध्ये जाऊन हॉस्टेलची पाहणी केली. तसेच हॉस्टेलमधील विद्यार्थींनीशी संवाद साधून त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी चर्चा करून त्यांच्याकडूनही घटनेची माहिती घेतली. त्यानंतर चित्रा वाघ भडकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्या बोलत असताना म्हणाल्या, आरोपी धोबी होता. आधी तो इथे धोब्याचं काम करत होता. त्याच्यावर सगळयांचा विश्वास होता म्हणून त्याला वॉचमनचं काम दिलं होतं. मी विद्यार्थीनींशी संवाद साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं. त्याची नजर चांगली नव्हती, असं सांगतानाच जो धोब्याचं काम करायचा त्याला वॉचमनचा काम कसं देण्यात आलं? कोणी परवानगी दिली?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.