Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh Case : आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?

Santosh Deshmukh Case : आधे इधर, आधे उधर… बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?

| Updated on: Apr 02, 2025 | 10:26 AM

बीड तुरुंगामधल्या टोळ्यांमध्ये मारहाणीच्या बातमीनंतर गित्ते आणि आठवले गँगच्या लोकांना हर्सूल आणि नाशिकच्या जेलमध्ये रवाना करण्यात आलेलं आहे. तर एकीकडे आठवले गँगचे लोक मारहाण झाल्याचं म्हणतायत तर दुसरीकडे तुरुंगामध्ये मारहाण घडलीच नसल्याचा दावा पोलीस करतायत. मात्र तरीसुद्धा कैदी इतरत्र का हलवले गेले हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे.

बीड जिल्ह्यात गँगवारचा कहर म्हणजे आता तुरुंग सुद्धा भाईगिरीचा अड्डा बनले आहे. समाजात शांतता नांदावी म्हणून आरोपींना तुरुंगात बंद करण्याचा प्रघात आहे. मात्र बीडमध्ये तुरुंगातच हाणामारी रंगल्या पण आता या साऱ्या वादात वाल्मिक कराडला मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तुरुंगात कराड आणि गित्ते टोळीत हाणामारीची बातमी आली. कराड आणि गित्ते टोळीचा आधीपासूनच 36 चा आकडा राहिलाय. पण वाल्मिक कराडला बीड कारगृहात व्हीआयपी सुरक्षा देता यावी यासाठीच अडथळा ठरणारे इतर कैदी मारहाणीच्या कारणाने दुसरीकडे पाठवले जात असल्याचा आरोप केला जातोय.

बीड कारगृहात एका बराकीत कराडची टोळी, बाजूच्या बराकीत कराड विरोधक बबन गित्ते गँगची टोळी आणि दुसऱ्या बराकीत कराड विरोधीच असणारी आठवले गँगची टोळी होती. काल गित्ते आणि आठवले टोळीने घुले आणि कराडला मारहाण केल्याची बातमी आली. आधी तर बीड पोलिसांनी ही बातमीच फेटाळून लावली. मात्र नंतर कराड टोळीनेच आपल्याला मारहाण केल्याचं गित्ते टोळीतल्या सदस्यांनी सांगितलं. तुरुंगात मारहाणीची बातमी आहे बीड पोलीस यांनी नाकारली. नंतर मात्र गित्ते टोळीने मारहाण झाली म्हणून सांगितलं. यानंतर तात्काळ गित्ते टोळीला बीडमधून हर्सूलच्या तुरुंगात हलवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी आठवले टोळीची रवानगी नाशिकच्या तुरुंगात झाली आहे. मात्र कराडला बीडमध्येच ठेवल्यामुळे त्याच्या आता व्हीआयपी ट्रीटमेंटचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोप होऊ लागलाय.

Published on: Apr 02, 2025 10:25 AM