Sadabhau Khot | राष्ट्रवादी काँग्रेसची गुंडागर्दी सहन करणार नाही, पडळकरांना तत्काळ संरक्षण द्या : सदाभाऊ खोत
. भविष्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीविताला धोका असून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. तेव्हा त्यांना तत्काळ संरक्षण देण्यात यावे,” अशी मागणी आमदार खोत यांनी केली.
सांगली : गोरगरिबांचे आणि बहुजनांचे प्रश्न गोपीचंद पडळकर मांडतात. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्ला घडवून आणला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही गुंडागर्दी यापुढे कदापि सहन केली जाणार नाही. या आधीही राष्ट्रवादीकडून आमदार पडळकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. भविष्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीविताला धोका असून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. तेव्हा त्यांना तत्काळ संरक्षण देण्यात यावे,” अशी मागणी आमदार खोत यांनी केली.
Latest Videos