अन्यथा मुंबईत घेणार जलसमाधी, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

अन्यथा मुंबईत घेणार जलसमाधी, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

| Updated on: Feb 16, 2024 | 4:18 PM

मराठा म्हणूनच ओबीसी मधून 50 टक्केच्या आतलं टिकणारं आरक्षण द्या अन्यथा मराठा क्रांती मोर्चाचे लाखो कार्यकर्ते मुंबईत येऊन जलसमाधी घेतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिला आहे

धाराशिव, १६ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन पेटलेलं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झाला आहे. मराठा म्हणूनच ओबीसी मधून 50 टक्केच्या आतलं टिकणारं आरक्षण द्या अन्यथा मराठा क्रांती मोर्चाचे लाखो कार्यकर्ते मुंबईत येऊन जलसमाधी घेतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मराठा आरक्षणासाठी लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवा आणि त्याच अधिवेषणात निर्णय जाहीर करा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन हे कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत. सुनील नागणे यांनी मराठा आरक्षणासाठी तुळजापूर ते मुंबई अशी पायी वनवास यात्रा काढली होती. आता आक्रमक भूमिका घेत सुनील नागणे यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

Published on: Feb 16, 2024 04:18 PM