मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या, कसे देत नाही तेच बघतो; जरांगेंच्या मागणीवर नितेश राणे म्हणाले…
राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इतकंच नाहीतर सरकार मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही, तेच पाहतो, असं इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. जरांगेंच्या मागणीनंतर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.
जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इतकंच नाहीतर सरकार मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही, तेच पाहतो, असं इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेल्या मागणीनंतर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. मुस्लिम धर्माला धर्माच्या नावाने आपल्या संविधानात कोणालाही आरक्षण मिळत नाही. धर्माच्या नावाने नाहीतर जातीच्या नावाने आरक्षण मिळतं हे मनोज जरांगे पाटील यांना माहिती नसावं, असं म्हणत नितेश राणेंनी हल्लाबोल केला. बघा मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम धर्मासाठी नेमकी कोणती मागणी सरकारकडे केली? त्यावर काय म्हणाले नितेश राणे?