Goa Assembly Election : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Goa Assembly Election : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

| Updated on: Jan 21, 2022 | 5:40 PM

गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. याचदरम्यान आज शिवसेनेकडून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. याचदरम्यान आज शिवसेनेकडून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आम्ही गोव्यात दहा ते बारा जागा लढवणार आहोत, त्यापैकी नऊ उमेदवारांची यादी जाहीर करत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.