VIDEO : गोव्यात मुख्यमंत्री Pramod Sawant यांचा साखळी मतदार संघातून विजयी - Goa Election Result

VIDEO : गोव्यात मुख्यमंत्री Pramod Sawant यांचा साखळी मतदार संघातून विजयी – Goa Election Result

| Updated on: Mar 10, 2022 | 1:32 PM

गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच कांटे की टक्कर होती. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप उत्सुक आहे, मात्र काँग्रेसही कडवी झुंज देताना दिसत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत  विजयी झाले आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच कांटे की टक्कर होती. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप उत्सुक आहे, मात्र काँग्रेसही कडवी झुंज देताना दिसत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत  विजयी झाले आहेत. साखळी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना सावंतांनी पराभवाची धूळ चारली. मात्र विजय मिळवताना त्यांची पुरती दमछाक झाली. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. केपेमध्ये बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर पराभूत झाले आहेत. तर मडगाव मतदारसंघातून बाबू उर्फ मनोहर आजगावकरही चारी मुंड्या चित झाले आहेत. विशेष म्हणजे दोघंही उपमुख्यमंत्री पक्षांतर करुन भाजपात आले होते.