Digambar Kamat | गोव्यात भाजपची उलटी गिणती सुरू झालीय – दिगंबर कामत

| Updated on: Jan 05, 2022 | 9:38 PM

महाविकास आघाडी स्थापन व्हायला हरकत नाही. भाजपचे सरकार येऊ नये अशी गोवेकरांची ईच्छा आहे. मतविभागणी टाळा असे जनतेचे म्हणणे आहे. त्यामुळे संजय राऊत यांची संकल्पना चांगली आहे. जर ते थोडे आधी आले असते तर आणखी सुरळीत झाले असते.

गोवा : काँग्रेसचा सुरुवातीपासून प्रयत्न होता की भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे. आमची NCP, MGP आणि गोवा फॉरवर्डशी बोलणी सुरू होती. मध्येच TMC आणि MGP त्यांच्याबरोबर निघून गेली. गोवा फॉरवर्ड बरोबर अंडरस्टॅडींग झाली. शिवसेनेचे संजय राऊत आता इथे आले, त्यांच्याशी बोलणी, झाली पुन्हा होतील. महाविकास आघाडीचा त्यांनी विचार मांडला आणि त्यावर विचारमंथन सुरू आहे. महाविकास आघाडी स्थापन व्हायला हरकत नाही. भाजपचे सरकार येऊ नये अशी गोवेकरांची इच्छा आहे. मतविभागणी टाळा असे जनतेचे म्हणणे आहे. त्यामुळे संजय राऊत यांची संकल्पना चांगली आहे. जर ते थोडे आधी आले असते तर आणखी सुरळीत झाले असते.