Nanded | Godavari River | नांदेडमध्ये गोदावरीला महापूर, नदीच्या रौद्ररुपाची ड्रोन दृश्यं
नांदेडमध्ये सोळा वर्षाच्या नंतर प्रथमच गोदावरी नदीने आता विशाल रूप धारण केलय. यापूर्वी 2006 साली नांदेडमध्ये गोदावरीला महापुर आला होता. त्यानंतर आता प्रथमच गोदावरी नदीने रौद्र आणि तितकेच विहंगम रूप धारण केलय, गोदामाईच्या या दुर्मिळ रूपाचा ड्रोन कॅमेराच्या नजरेतून घेतलेला हा आढावा ....
नांदेडमध्ये सोळा वर्षाच्या नंतर प्रथमच गोदावरी नदीने आता विशाल रूप धारण केलय. यापूर्वी 2006 साली नांदेडमध्ये गोदावरीला महापुर आला होता. त्यानंतर आता प्रथमच गोदावरी नदीने रौद्र आणि तितकेच विहंगम रूप धारण केलय, गोदामाईच्या या दुर्मिळ रूपाचा ड्रोन कॅमेराच्या नजरेतून घेतलेला हा आढावा ….
ड्रोन कॅमेरातुन दिसणारा हा आहे विष्णुपुरीचा आशिया खंडातील पहिला उपसा सिंचन प्रकल्प ज्यातून नांदेडसह आजूबाजूच्या अनेक गावांना पाणीपुरवठा होतो. या विष्णुपुरीच्या बंधाऱ्याचे 18 पैकी 15 दरवाजे आज सकाळी उघडलेत, त्यामुळे गोदावरी नदी सध्या काठोकाठ भरून वाहतेय. नांदेड शहराला वळसा घातलेल्या गोदावरी नदीवर तीन नवीन आणि एक निजामकालीन पूल आहे, हे चारही मोठे पूल नदीच्या प्रवाहापुढे लहान भासतायत. नदीचा प्रवाह इतका आहे की, ओढ्या नाल्याचे पाणी सध्या नदीत शिरू देखील शकत नाहीये, त्यामुळे पाण्याचा फुगवटा तयार होऊन अनेक जागी पुरसदृश्य स्थिती आहे. एरव्ही कवितांमधून संथ वाहते गोदामाई ची कविता सर्वांनीच ऐकलेली वाचलेली असते मात्र गोदावरीच्या या विशाल रुपाला ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नांदेडचे व्हीडिओ ग्राफर ” गणेश नागेश्वर” यांनी टिपलंय… डोळ्यात साठवून ठेवावे असे विहंगम दृश्य पुन्हा कधी पहायला मिळेल ते माहीत नाही म्हणूनच tv9 मराठीच्या दर्शकांसाठी ही खास दृश्य…!
Latest Videos