Jalgaon | जळगावमध्ये सोन्यात 1200 तर चांदीत 4 हजारांनी घसरण

Jalgaon | जळगावमध्ये सोन्यात 1200 तर चांदीत 4 हजारांनी घसरण

| Updated on: Aug 11, 2021 | 1:26 PM

सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात मोठ्या उलाढाली होत आहेत. गेल्या 3 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 200 रुपयांनी खाली आले आहेत.

Jalgaon | सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात मोठ्या उलाढाली होत आहेत. गेल्या 3 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 200 रुपयांनी खाली आले आहेत. आज, बुधवारी जळगावात सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह 47 हजार 700 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर जीएसटी शिवाय 63 हजार रुपये प्रति किलो आहेत.

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी (9 ऑगस्ट) 2 हजार 500 रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा 1 हजार 500 रुपयांची घसरण होऊन ती 65 हजार रुपये प्रतिकिलोवर आली. सोने मात्र 47 हजार 400 रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. सोन्याचे दर सोमवारी 1 हजार 300 रुपयांनी कमी झाले होते.

Gold silver rate decreases in Jalgaon Know new price

Published on: Aug 11, 2021 01:26 PM