‘Maratha Reservation च्या नावे जर सरकारने यंदा भरती रद्द केली तर…’, कुणी दिला थेट इशारा?
VIDEO | जेव्हा राज्य सरकारकडून नोकरीमध्ये मेगा भरती निघते, त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुढे करून मोठ्या प्रमाणात होणारी नोकर भरती रद्द केली जाते, आमदार विनोद अग्रवाल यांचा हल्लाबोल
गोंदिया, १९ सप्टेंबर २०२३ | राज्य सरकार जेव्हा नोकरीमध्ये मेगा भरती करते त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुढे ठेवला जातो आणि मोठ्या प्रमाणात होणारी नोकर भरती ही रद्द केली जाते, असा घणाघाती आरोप गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी केला आहे. महाराष्ट्र शासन जेव्हा नोकरी भरती करण्याची जाहिरात देते आणि त्याच्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुढे केला जातो आणि ती नोकरी भरती रद्द केल्या जाते, असा गेल्या सात वर्षापासून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी जर सरकारने मराठा आरक्षणाच्या नावावर कोणती भरती रद्द केली तर याविरुद्ध आंदोलन करून सरकारला धारेवर धरण्यात येईल, असा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी दिला आहे. तसेच मराठ्यांना आरक्षण द्यावे मात्र ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी ठामपणे भूमिका त्यांनी मांडली असल्याचे पाहायला मिळाले.

प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका

बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?

लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ...

राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला
