Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MSRTC : 'लालपरी'नं प्रवास करणाऱ्यांसठी गुड न्यूज... 'येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ....', परिवहन मंत्र्यांकडून मोठी ग्वाही

MSRTC : ‘लालपरी’नं प्रवास करणाऱ्यांसठी गुड न्यूज… ‘येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ….’, परिवहन मंत्र्यांकडून मोठी ग्वाही

| Updated on: Apr 14, 2025 | 11:57 AM

एसटी महामंडळाच्या लालपरीने प्रवास कऱणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी बस कुठे पोहोचली? हे आता तुम्हाला जाणून घेता येणार? परिवहन मंत्र्यांनी काय दिली मोठी ग्वाही

कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागात एसटी दळणवळणाचे मुख्य साधन आहे. अनेकांची सकाळ ही एसटीच्या प्रवासानेच होते. मग ते शाळकरी मुले असो किंवा एखाद्या गावचा सरपंच असो… पण अनेकदा ही लालपरी वेळवर येत नसल्याने किंवा नेमकी बस कुठे पोहोचली हे समजत नसल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा होताना दिसतो. अशातच प्रवाशांच्या सेवेसाठी आणि रस्ता तेथे एसटी या ब्रीद वाक्यानुसार एस महामंडळ खेडोपाडी एसटीची सेवा प्रवाशांना देत असते. अशातच राज्यभरात विविध योजनांमुळे जाईन तर एसटीनेच, असा आग्रह ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवासी धरत असल्याचे दिसतेय. त्याच राज्य परिवहन महामंडळ अर्थात लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई लोकलचं वेळापत्रक आणि लाईव्ह लोकेशन कळतं त्याप्रमाणे तुमच्या लालपरीचे देखील तुम्हाला जाणून घेता येणार आहे. येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ लाईव्ह एसटी बस कुठे पोहोचली हे प्रवाशांना जाणून घेता यावं यासाठी नवी सुविधा करणार आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना ग्वाही दिली. त्यामुळे आता एसटी बस कुठे आहे? याचा ठावठिकाणा आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये एका ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कळणार आहे.

Published on: Apr 14, 2025 11:47 AM