Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडचा लोकार्पण सोहळा, बघा LIVE

Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडचा लोकार्पण सोहळा, बघा LIVE

| Updated on: Mar 11, 2024 | 10:44 AM

मुंबईकरांची इतक्या वर्षांची प्रतीक्षा आज संपणार आहे. कारण बीएमसी (मुंबई महानगरपालिका)च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचं (सागरी किनारा मार्ग) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार

मुंबई, ११ मार्च २०२४ : मुंबईकरांसाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण लवकरच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईकरांची इतक्या वर्षांची प्रतीक्षा आज संपणार आहे. कारण बीएमसी (मुंबई महानगरपालिका)च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचं (सागरी किनारा मार्ग) आज उद्घाटन होणार आहे. कोस्टल रोडची (दक्षिण) एक बाजू वाहतुकीसाठी खुली होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उद्घाटन होणार आहे. दक्षिण मुंबईतील परिसर हा व्यापार उदिमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. दक्षिण मुंबईला थेट ऊत्तर मुंबईशी जोडलं जाण्यात या रोडची महत्वाची भूमिका असणा असून मुंबईसाठी हा रस्ता गेम चेंजर ठरणार आहे. कोस्टल रोड प्रोजेक्ट हा पहिल्या टप्प्यात मरीन ड्राइव ते वरळीपर्यंत आहे, जो पुढे वरळी-बांद्रा सी लिंकहून कनेक्ट होईल. त्यामुळे 30 मिनिटांचं अंतर 10 मिनिटांत पार होईल. तप पुढे हा रस्ता वरळी ते बांद्रा आणि त्यापुढे दहीसरपर्यंत जाणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडचा लोकार्पण सोहळा, बघा LIVE….

Published on: Mar 11, 2024 10:44 AM