ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदर रोड 14 मीटर रुंद होणार; काय म्हणाले प्रताप सरनाईक?
VIDEO | ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी, घोडबंदर रोड 14 मीटर रुंद होणार!
ठाणे : ठाणेकरांना आणि प्रामुख्याने घोडबंदर वासियांना अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे घोडबंदर रोड १४ मीटर रुंद होणार आहे. घोडबंदरवरून जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी निर्णय घेतला असल्याचे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ठाण्यातील कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत, घोडबंदर सर्व्हिस रोड वरील ९ मीटरवरून ७-७ मीटर रस्ता रुंद करण्यात यावा, असा विचार झाला. त्यामुळे लवकरच घोडबंदर रोड १४ मीटर रुंद होणार असून जास्तीच्या गाड्या आता धावताना दिसतील आणि भविष्यातील वाहतूक कोंडीपासून देखील सुटका होईल, असे त्यांनी सांगितले आहे. तर सिटी इंजिनिअरने सांगितल्याप्रमाणे ५० कोटी खर्च येऊ शकतो आणि हा रस्ता डांबरीकरणाचा होणार होता मात्र काँक्रीटीकरण केले तर मोठा खर्च होऊ शकतो पण भविष्यासाठी उत्तम ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.
Published on: Feb 14, 2023 06:11 PM
Latest Videos