Kokan MLC Election : कोकण पदवीधरसाठी 13 उमेदवार मैदानात, रमेश कीर vs निरंजन डावखरेंमध्ये लढत; मतदानासाठी गर्दी

Kokan MLC Election : कोकण पदवीधरसाठी 13 उमेदवार मैदानात, रमेश कीर vs निरंजन डावखरेंमध्ये लढत; मतदानासाठी गर्दी

| Updated on: Jun 26, 2024 | 12:20 PM

कोकण पदवीधर मतदार संघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून रमेश कीर तर भाजपकडून निरंजन डावखरे हे दोघे उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, निरंजन डावखरे सलग दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार राहिले आहे.

रत्नागिरीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी शहरातून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतांना दिसतोय. पदवीधर मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसताय. कोकण पदवीधर मतदार संघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून रमेश कीर तर भाजपकडून निरंजन डावखरे हे दोघे उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, निरंजन डावखरे सलग दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार राहिले आहे. त्यामुळे यंदा हॅट्रीक होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक मतदार असून ठाणे जिल्ह्यात ९८ हजार मतदार आहेत तर रायगड जिल्ह्यात ५४ हजार मतदार आहेत. पालघर जिल्ह्यातून २८ हजार मतदार, रत्नागिरी जिल्ह्यात २२ हजार मतदार तर सिंधुदुर्गात १८ हजार मतदार आहेत.

Published on: Jun 26, 2024 12:20 PM