Gopichand Padalkar | कामगारांच्या आत्महत्यांवर सरकारचं भाष्य नाही, हा कॉमन मिनिममचा भाग आहे?: गोपीचंद पडळकर
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन संपू नये अशी आमची भूमिका नाही. राज्य सरकारला हा विषय संपवायचा नाही. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार करण्याचं ठरलंय असं सांगितलं जातं, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन संपू नये अशी आमची भूमिका नाही. राज्य सरकारला हा विषय संपवायचा नाही. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार करण्याचं ठरलंय असं सांगितलं जातं. राज्य सरकारमधील तीन पक्षांचा एसटीच्या जागांवर डोळा आहे का?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. महाविकास सरकार एसटी कामगारांच्या आत्महत्यांवर चर्चा करत नाही. सरकारच्या तिन्ही पक्षांचा हा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला केला आहे. पोलीस प्रशासनानं आझाद मैदानात पोलिसांची संख्या वाढवली आहे. पोलिसांनी आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Published on: Nov 20, 2021 05:39 PM
Latest Videos