Gopichand Padalkar | टक्केवारीसाठी आरोग्य विभागात घोटाळा – गोपीचंद पडळकर
'मागे जी आरोग्य भरती झाली त्यातही या आरोग्यमंत्र्यांनी आणि या सरकारनं घोटाळा केला होता. आम्ही सर्व आमदारांनी सभागृहात या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली होती. कारण, पेपरफुटीचे प्रकार झाले होते, कुणी फोनवरुन कॉपी केली होती, तिथे मुलं सापडली होती, त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या होत्या. तरीही आरोग्यमंत्र्यांनी त्यात चालढकलपणा केला. त्यावर चर्चा केली नाही', अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोळासंदर्भात केलीय.
‘मागे जी आरोग्य भरती झाली त्यातही या आरोग्यमंत्र्यांनी आणि या सरकारनं घोटाळा केला होता. आम्ही सर्व आमदारांनी सभागृहात या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली होती. कारण, पेपरफुटीचे प्रकार झाले होते, कुणी फोनवरुन कॉपी केली होती, तिथे मुलं सापडली होती, त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या होत्या. तरीही आरोग्यमंत्र्यांनी त्यात चालढकलपणा केला. त्यावर चर्चा केली नाही’, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोळासंदर्भात केलीय.
काही दिवसांपूर्वी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं, तिथे सेंटर चुकले. नांदेडच्या मुलाला लातूर, लातूरवाल्याला औरंगाबादचं सेंटर, मुंबईच्या मुलाला औरंगाबाद तालुक्यातील कन्नडचं सेंटर, या पलीकडे जाऊन एका मुलाला तर दिल्लीत नोएडामध्ये सेंटर देण्यात आलं. एकाला चीनमध्ये तर एकाला युगांडामध्ये… अरे काय तुमचा कारभार आहे. ब्लॅकलिस्टेड कंपनीला कंत्राट देण्याचं कारण काय? हे सगळं टक्केवारीसाठी सुरु आहे. यांना महाराष्ट्रातील मुलांचं करिअर उद्ध्वस्त करायचं आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून ते पैसे गोळा करत आहेत. 10 लाख, 15 लाख रुपये त्यांनी रेट काढलाय. जिथे रेट मिळत नाही तिथे सगळा गोंधळ घालून टाकत आहेत. म्हणून मी या सरकारचा जाहीरपणे निषेध करतो, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला.