Gopichand Padalkar | मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, पडळकरांची खोचक टीका

Gopichand Padalkar | मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, पडळकरांची खोचक टीका

| Updated on: Jul 21, 2021 | 1:21 PM

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत टीका केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या महापुजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले होते. त्यावरुन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.  “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय”, केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच आहे. मात्र तरीही सरकारनं याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.