Gopichand Padalkar | ST कर्मचाऱ्यांचा घात पवारांनी गेल्या 50 वर्षांपासून केला : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | ST कर्मचाऱ्यांचा घात पवारांनी गेल्या 50 वर्षांपासून केला : गोपीचंद पडळकर

| Updated on: Nov 18, 2021 | 7:55 PM

मागील अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनात उडी घेतली आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, असा पवित्रा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी घेतलाय. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा घात शरद पवार यांनी केला, असा आरोप पडळकर यांनी केला.

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनात उडी घेतली आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, असा पवित्रा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी घेतलाय. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा घात शरद पवार यांनी केला. त्यांचीच संघटना ही मान्यताप्रापत्त आहे. राज्य सरकार जी संघटना मान्यताप्राप्त आहे त्यांच्याशी चर्चा करते. मान्यताप्राप्त संघटनांनी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न कधी मांडलेच नाही.  सरकार आणि मान्यताप्राप्त संघटना यांनी मिळून  कर्मचाऱ्यांचा घात केला, अशी टीका पडळकर यांनी केली.