Video | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्निल गेला, सरकार मदत कधी करणार ? : गोपीचंद पडळकर
सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार घडला. स्पप्निल लोणकर याच्या कुटुंबीयांना सरकार मदत कधी करणार असा सवालही त्यांनी केला.
मुंबई : एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने आत्महत्या केल्यानंतर राज्य सरकारला गंभीर टीकेला सामोरे जावे लागले. आज गोपीचंद पडळकर यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्निल गेला असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला. स्वप्निल आई-वडील तसेच बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार घडला. स्पप्निल लोणकर याच्या कुटुंबीयांना सरकार मदत कधी करणार असा सवालही त्यांनी केला.
Latest Videos