Sangli | आटपाडीत गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गटात राडा

| Updated on: Nov 07, 2021 | 10:30 PM

आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला असून पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत. सांगली येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांमुळे येथील वातावरण सध्या भारले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष डावपेच आखताना दिसतोय. या घडामोडी घडत असताना आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्यादेखील फोडण्यात आल्या.