Gopichand Padalkar | बैलगाडा शर्यतींसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, ठाकरे सरकारविरोधात एल्गार

Gopichand Padalkar | बैलगाडा शर्यतींसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, ठाकरे सरकारविरोधात एल्गार

| Updated on: Aug 13, 2021 | 9:52 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात मोठा एल्गार दिलाय. बैलगाडा शर्यतीसाठी गोपीचंद पडळकर मैदानात उतरले आहेत. 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षिस पडळकर यांनी ठेवलं आहे. बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी नसली तरीही बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात मोठा एल्गार दिलाय. बैलगाडा शर्यतीसाठी गोपीचंद पडळकर मैदानात उतरले आहेत. 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षिस पडळकर यांनी ठेवलं आहे. बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी नसली तरीही बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. छकडी घेऊन या शर्यतीत सहभागी होण्याचं आवाहन पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचा वाद आता पेटण्याची चिन्ह आहेत. गोपीचंद पडळकर स्वत: 20 तारखेला छकडी घेऊन आंदोलन करणार आहेत.