Gopichand Padalkar | आमचा नाद चांगला आहे की पवारांचा हे कर्मचाऱ्यांना विचारा- गोपीचंद पडळकर

| Updated on: Nov 22, 2021 | 5:23 PM

शरद पवार यांनी 50 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व केलंय. मान्यताप्राप्त संघटना त्यांचीच आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना सगळ्या संघटनांना बाजूला केलंय. त्यामुळे यांची पोळी भाजली जाणार नसल्याची चिंता यांना लागली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला त्यातून यांना काही मिळणार नाही. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येत नसल्याचा गंभीर आरोपही पडळकर यांनी केलाय.

आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज 13 वा दिवस आहे. तरीही कुठला निर्णय होत नाही म्हणल्यावर हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होतं. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांशी संबंधित हा विषय आहे. असं असतानाही साधी बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले. या बैठकीतही कुठला निर्णय नाही. त्यावरुन हे निर्णयक्षम सरकार नाही, त्यांच्यात एकमत नसल्याचं स्पष्ट होतं, अशी खोचक टीका पडळकर यांनी केलीय.