Gopichand Padalkar | आमच्यावर एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे आरोप : गोपीचंद पडळकर
पहिवहन मंत्री अनिल परबांनी आपले अपयश झाकण्याकरिता, मी आणि सदाभाऊ, एस.टी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
पहिवहन मंत्री अनिल परबांनी आपले अपयश झाकण्याकरिता, मी आणि सदाभाऊ, एस.टी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. अनिल परब मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देतायेत.त्याचा आम्ही विरोध व निषेध करतो. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला बेकायदेशीरपणे सांगली जिल्हाबंदी केली आहे. त्याच चालाखीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता तर आज नक्कीच काही मार्ग निघाला असता. पण ज्या पद्धतीने मुंबई मील कामगारांचा संप चिघळवला व शेवटी अनिर्णयीत परिस्थितीत आणून ठेवला आणि नंतर मील मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोची टक्केवारी गोळा केली होती. त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव दिसतोय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.