Gopichand Padalkar | पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील ही मराठी माणसं नाहीत का?; पडळकरांचा राऊतांवर हल्ला
बेळगाव महापालिकेवरुन (Belgaum ) भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी घणाघात केला. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का?, असा सवाल त्यांनी विचारलाय.
बेळगाव महापालिकेवरुन (Belgaum ) भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी घणाघात केला. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का ? मराठी माणसाचा एवढा आकस का? असे प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी विचारले आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, असा संताप बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी व्यक्त केला होता. त्याला पडळकरांनी उत्तर दिलं.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत, म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस?”
Published on: Sep 08, 2021 12:03 PM
Latest Videos