Special Report | वाईनवरून राजकीय आरोपांची ‘झिंग’
जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. परदेशात वाईन मालकांच्या बैठकीचा ते खुलासा करतील, याची राऊतांना भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांचं झिंग झिंग झिंगाट झालंय, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय.
मुंबई: महाराष्ट्रातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला (Wine Sale in Maharashtra) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. यावर भाजपच्या वतीने टीकेची झोड उठवण्यात आली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा महाविकास आघाडीचा विचार आहे का, असा सवाल भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही तोंडसुख घेतले आहे. जनाब संजय राऊत (Sanjay Raut) हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. परदेशात वाईन मालकांच्या बैठकीचा ते खुलासा करतील, याची राऊतांना भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांचं झिंग झिंग झिंगाट झालंय, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. तर दुसरीकडे शिवसेने देखील सामनामधून भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
Latest Videos