सह्याद्रीवर अनिल परब आणि ST कर्मचाऱ्यांची बैठक, पडळकरही राहणार उपस्थित
आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत.
मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी 14 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. अशावेळी आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होण्यासारखी नसल्याचं सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय. अशावेळी कुठला मध्यममार्ग या बैठकीतून निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Latest Videos