Old Pension : सरकारी कर्मचारी आक्रमक, 14 डिसेंबरपासून जाणार संपावर, काय आहे नेमकी मागणी?

Old Pension : सरकारी कर्मचारी आक्रमक, 14 डिसेंबरपासून जाणार संपावर, काय आहे नेमकी मागणी?

| Updated on: Dec 12, 2023 | 4:10 PM

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक होताना दिसत असून आता कर्मचाऱ्यांनी संपाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आज विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.

नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : पेन्शनची मागणी करणारे कर्मचारी येत्या १४ डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक होताना दिसत असून आता कर्मचाऱ्यांनी संपाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आज विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. नागपुरात जुन्या पेन्शन योजनेसाठी महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या वेळी १४ डिसेंबरपासून पेन्शनची मागणीसंदर्भात राज्यभर संपाची घोषणाही करण्यात आली. सरकारला जाग आणण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आज नागुपारत ऐकवटल्याचे पाहायला मिळाले. या जनसमुदायाला विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिला आहे. पुढे वडेट्टीवार असेही म्हणाले, आमच्या पक्षाची भूमिका जुनी पेन्शन लागू करण्याची आहे. तुमच्या हक्कासाठी यापूर्वीही स्पष्ट भूमिका मी ठेवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 12, 2023 04:10 PM