Devendra Fadnavis | ओबीसींवर एक पैसा सरकारने खर्च केला नाही : देवेंद्र फडणवीस
एम्पिरिकल डेटा आणि जनगणनेचा डेटा यात सुद्धा कायम बुद्धिभेद केला जातो. केंद्राकडे आहे तो जनगणनेचा डेटा आणि त्याचा आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षण देण्यासाठी एम्पिरिकल डेटा हवा आहे आणि तो राज्य सरकारच मागासवर्ग आयोगाकडून मिळवू शकते, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी जागर अभियानादरम्यान म्हटलं.
एम्पिरिकल डेटा आणि जनगणनेचा डेटा यात सुद्धा कायम बुद्धिभेद केला जातो. केंद्राकडे आहे तो जनगणनेचा डेटा आणि त्याचा आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षण देण्यासाठी एम्पिरिकल डेटा हवा आहे आणि तो राज्य सरकारच मागासवर्ग आयोगाकडून मिळवू शकते, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी जागर अभियानादरम्यान म्हटलं. ओबीसी आरक्षण केवळ गेले नाही तर ओबीसी समाजावर आज मोठा अन्याय होतो आहे. याचसाठी हे ओबीसी जागर अभियान आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाकरे सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसी आरक्षण गेले. या सरकारची इको सिस्टीम एका सुरात खोटे बोलते. ओबीसी आरक्षण संपूर्ण देशात गेले नाही तर केवळ आणि केवळ महाराष्ट्रात गेले आहे, असं फडणवीस म्हणाले.
Latest Videos