...म्हणून निकाल द्यायला निवडणूक आयोगाला लागतोय वेळ, संजय राऊत यांचा आरोप

…म्हणून निकाल द्यायला निवडणूक आयोगाला लागतोय वेळ, संजय राऊत यांचा आरोप

| Updated on: Jan 21, 2023 | 1:42 PM

'चार-चार महिने निवडणूक आयोग शिवसेना पक्ष, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यावर निकाल देत नसेल तर निवडणूक आयोगावर दबाव टाकला जात आहे. असे असले तरी...'

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं असा प्रश्नच उपस्थित व्हायला नको. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांचे आहे आणि या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहे. जिथे ठाकरे तिथे शिवसेना आहे. कोणीही उठून शिवसेनेवर दावा करेल तर हे योग्य नाही. चार चार महिने निवडणूक आयोग या निर्णयावर निकाल देत नसेल तर याचा अर्थ असा की, निवडणूक आयोगावर सरकारकडून दबाव टाकण्यात आला आहे. असे असले तरी मला विश्वास आहे की, सरकारची दबाव खेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चालणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव आहे, त्यामुळेच निकाल द्यायला वेळ लागत आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. तर शिवसेनेचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. इतर कोणीही ठरवणार नाही. अध्यक्ष ठरवणे न ठरवणे हा तांत्रिक मुद्दा आहे, असे संजय राऊत जम्मूच्या दौऱ्यावर असताना म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच जम्मूत शिवसेना निवडणूक लढणार असल्याचेही जाहीर केले.

Published on: Jan 21, 2023 01:39 PM