'स्वाभिमानी'चं ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन

‘स्वाभिमानी’चं ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन

| Updated on: Mar 02, 2022 | 10:29 PM

सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्या मान्य केल्या नाही तर 4 मार्च रोजी ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

फेब्रुवारीच्या 22 तारखेपासून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमान संघटनेच्या राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्या मान्य केल्या नाही तर 4 मार्च रोजी ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ही मागणी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्याला दिवसा दहा तास वीज मिळावी आणि शासनाची जी बोगस बिलं आहेत ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे. सरकारने जर शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी व चर्चेसाठी बोलवण्यात आले तर आंदोलन सुरु ठेऊन आम्ही सरकारसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.