Bangladesh Crisis :  सत्ता बदलेल की बांगलादेश बदलेल? कट्टरपंथियांच्या नादात बांगलादेशात पुन्हा बर्बादी होणार?

Bangladesh Crisis : सत्ता बदलेल की बांगलादेश बदलेल? कट्टरपंथियांच्या नादात बांगलादेशात पुन्हा बर्बादी होणार?

| Updated on: Aug 09, 2024 | 10:50 AM

बांगलादेशातील सत्ता सांभाळण्यासाठी मोहम्मद युनूस पॅरिसमधून बांगलादेशमध्ये दाखल झाले आहेत. ते तात्पुरत्या स्वरूपात बांगलादेशचा कारभार सांभाळणार आहेत. मात्र त्यांच्याच अडून कट्टरपंथीयांच्या हाती बांगलादेशची सत्ता जाईल, यावरून चिंता व्यक्त केली जात आहे.

शेख हसीना यांची सत्ता उलथवल्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचं सरकार सुरू झाले आहे. मोहम्मद युनूस पॅरिसमधून बांगलादेशमध्ये परतताच देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढा होता असा त्यांनी आवाहन केलं. मात्र लोकांचं हित जोपासलं न गेल्यास स्वातंत्र्य व्यर्थ ठरेल, असंही ते म्हणाले. जेव्हा पाकिस्तानची भारतापासून फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान दोन गटात विभागलंय. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान…या मध्ये पश्चिम पाक म्हणजे आताचा पाकिस्तान आणि पूर्व पाक म्हणजे आजचा बांगलादेश.. युद्ध झाल्यास एकाच वेळीस दोन भौगोलिक परिस्थितीवर तोंड देणं भारतासमोर अडचणीचं होतं. त्यावेळी शेख हसीना यांचे वडील रहमान यांच्या पुढाकारानं बांगलादेश स्वातंत्र्यासाठी मुक्तवाहिनी उभी राहिली. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं त्यावेळी काय काय घडलं होतं?

Published on: Aug 09, 2024 10:50 AM