कंत्राटी भरतीमागे महायुती की मविआ सरकार? काल विरोधात अन् आज सत्तेत असलेल्यांची भूमिका काय?

कंत्राटी भरतीमागे महायुती की मविआ सरकार? काल विरोधात अन् आज सत्तेत असलेल्यांची भूमिका काय?

| Updated on: Sep 17, 2023 | 9:05 AM

tv9 Special Report | कंत्राटी भरतीची प्रक्रिया नेमक्या कोणत्या सरकारनं आणली? काल विरोधात आणि आज सत्तेत असलेल्या नेत्यांच्या याबद्दलची भूमिका नेमकी काय? बघा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १७ सप्टेंबर २०२३ | सरकारच्या कंत्राटी नोकर भरतीला विरोध सुरु आहे. यामागे काही नेते काटकसरीचं कारण देतायत. काही तांत्रिक अडचणींचं तर काही तात्पुरत्या प्रकल्पांचं…. कंत्राटी भरतीची प्रक्रिया नेमक्या कोणत्या सरकारनं आणली आणि काल विरोधात आणि आज सत्तेत असलेल्या नेत्यांच्या याबद्दलची भूमिका नेमकी काय आहे? माहित आहे का? सरकारनं अनेक पदांवर कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला तीव्र विरोध होऊ लागला आहे. अजित पवार यांनी याआधी कंत्राटी भरतीमागे सरकारी पैशांच्या काटकसरीचं कारण दिलं होतं. एक सरकारी नोकराच्या पगारात ३ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार निघतील असं अजित पवार म्हणाले होते. मात्र ज्या कंपन्या कंत्राटी कर्मचारी नेमणार आहेत. त्यांना सरकार १५ टक्के सर्व्हिस चार्ज देणार आहे., त्यावर रोहित पवारांनी ट्विट करत अजित पवारांनी सांगितलेल्या काटकसरीवर प्रश्न उभे केले आहेत. बघा काय उपस्थित केले सवाल?

Published on: Sep 17, 2023 09:05 AM