महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, महायुतीतील 'या' 7 जणांनी घेतली शपथ

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, महायुतीतील ‘या’ 7 जणांनी घेतली शपथ

| Updated on: Oct 15, 2024 | 1:07 PM

राज्यतील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुतीकडून मोठी खेळी करण्यात आल्याची चर्चा होतांना दिसतेय. महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांनी आज शपथ घेतली. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.

गेल्या काही वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांच्या नियुक्तीला मुहूर्त काही मिळत नव्हता. अखेर आज विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात चित्रा वाघ (भाजप) विक्रांत पाटील (भाजप) बाबूसिंग महाराज राठोड (भाजप) मनीषा कायंदे (शिंदे गट) हेमंत पाटील (शिंदे गट) पंकज भुजबळ (अजित पवार गट) इद्रिस नायकवडी (अजित पवार गट) यांनी आमदारकीची शपथ घेतली. उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. बघा राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचा शपथविधी सोहळा UNCUT

Published on: Oct 15, 2024 01:06 PM