मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेनंतर सरकारकडून GR जारी, मनोज जरांगे उपोषण मागे घेणार?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेनंतर सरकारकडून GR जारी, मनोज जरांगे उपोषण मागे घेणार?

| Updated on: Sep 07, 2023 | 5:02 PM

VIDEO | जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या मागणीचा विचार करुन शिंदे-फडणवीस सरकारचा अधिकृत जीआर जारी करण्यात आलाय. बघा काय म्हटलंय शासन निर्णयात?

मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ | जालन्यातील आंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस होता. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसापासून करत होते. दरम्यान, ‘ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी असतील, त्यांना कुणबी दाखले दिले जातील’, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी काल घोषणा केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या मागणीचा विचार करुन शिंदे-फडणवीस सरकारचा अधिकृत जीआर जारी करण्यात आला आहे. सरकारने मनोज जरांगे यांना पत्र पाठवलंय. या पत्रात सरकारने जीआरबाबत माहिती देत जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

Published on: Sep 07, 2023 04:54 PM