मविआवर महायुती ठरली वरचढ, ग्रामपंचायतीच्या निकालात कोणाचा नंबर कितवा?

मविआवर महायुती ठरली वरचढ, ग्रामपंचायतीच्या निकालात कोणाचा नंबर कितवा?

| Updated on: Nov 07, 2023 | 11:17 AM

हाती आलेल्या २ हजार २८५ निकालात भाजपनं ७२४ हून अधिक ग्रामपंचायतीवर विजय मिळवलाय. त्यामुळे नंबर एकवर भाजप आहे. त्यानंतर ४११ जागांवर विजय मिळवत अजित दादा गट दुसऱ्या स्थानी तर तिसऱ्या स्थानी २६३ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने मिळवला विजय

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारली आणि महायुतीमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरलाय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केलाय. तब्बल २ हजार ३६० ग्रामपंचायतीचा काल निकाल लागला यामध्ये पुन्हा एकदा भाजपच मोठा पक्ष ठरलंय. मुंबईत भाजपनं जोरदार जल्लोष केलाय. हाती आलेल्या २ हजार २८५ निकालात भाजपनं ७२४ हून अधिक ग्रामपंचायतीवर विजय मिळवलाय. त्यामुळे नंबर एकवर भाजप आहे. त्यानंतर ४११ जागांवर विजय मिळवत अजित दादा गट दुसऱ्या स्थानी तर तिसऱ्या स्थानी २६३ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवलाय. यानंतर काँग्रेस, शरद पवार गट आणि नंतर ठाकरे गटाचा नंबर लागतोय. काल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीवर महायुती वरचढ ठरली आहे. बघा ग्रामपंचायत निवडणूक निकालात कुणाचा कितवा नंबर लागला.

Published on: Nov 07, 2023 11:15 AM