शिंदे गटाचा ‘वर’ आणि ठाकरे गटाची ‘वधू’ यांचे जुळले सूर, कुठं बांधली अनोखी लग्नगाठ?
राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांशी वैर वाढलेले असले तरी ज्या ठाण्यातून या वैराला सुरुवात झाली त्याच ठाण्यात एका विवाहाची चर्चा जोरदार चालू आहे. हा विवाह म्हणजे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचा असून यानिमित्ताने दोन्ही गटातील नेते, कार्यकर्ते आले एकत्र
ठाणे, २२ डिसेंबर २०२३ : राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांशी वैर वाढलेले असले तरी ज्या ठाण्यातून या वैराला सुरुवात झाली त्याच ठाण्यात एका विवाहाची चर्चा जोरदार चालू आहे. हा विवाह म्हणजे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचा असून यानिमित्ताने दोन्ही गटातील नेते कार्यकर्ते एकत्र येताना दिसून आले. आमदार रवींद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक आणि सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गावकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक अॅड.आरती खळे यांचा शुभ विवाह ठाण्यातील घोडबंदर परिसरात पार पडला. यावेळी दोन्ही गटाचे सूर जुळलेले यानिमित्ताने पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नाशिक संघटक हेमंत पवार तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, राजन विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक नरेश मणेरा आणि स्थानिक शिंदे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र एकाच ठिकाणी आल्याने पाहायला मिळाले.

औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन

त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?

तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला

दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
