महाराष्ट्रात कोरोनाची वाढ? राजेश टोपे काय सांगतात पहा
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले की, आज जी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे ती मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या एक दोन जिल्ह्यातच दिसून येत आहे.
मुंबई आणि आसपासच्या उपनगरात कोरोनाची संख्या वाढत असताना दिसत जरी असली तरी चिंता करण्याचे कारण नाही असा दावा आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. पावसाळ्यात डायरियासारखे आजार होण्याची भीती जास्त असते म्हणून ग्रामीण तसेच झोपडपट्टी भागातल्या लोकांनी पाणी उकळून पिण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केल्या. पावसाळयात ज्या ठिकाणी दुषित पाणी येते त्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
Published on: Jun 01, 2022 04:00 PM
Latest Videos