GST On Essential Goods : महागाईचा भडका! GSTचे नवे दर लागू, खाण्या-पिण्यासह या वस्तू होतील महाग

GST On Essential Goods : महागाईचा भडका! GSTचे नवे दर लागू, खाण्या-पिण्यासह या वस्तू होतील महाग

| Updated on: Jul 18, 2022 | 10:36 AM

ग्राहकांना पॅकड, सीलबंद, लेबल लावलेल्या अनेक रोजच्या वापरातील वस्तूंसाठी जादा दाम मोजावे लागतील. यामध्ये दही, ताक, पनीर, पीट, सोयाबीन, मटार, गहु आणि अन्य धान्य महाग होणार आहे. 

मुंबई :  देशात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालाय. आता आपल्याला महागाईमुळे जपून खाण्याचाही विचार करावा लागू शकतो.  आजपासून घरगुती वापराच्या अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी (GST On Essential Goods) लागू करण्यात आलाय. या निर्णयामुळे तुम्हाला आणखी महागाईची झळ बसणार इतकं मात्र नक्की. काही पॅकबंद (Packed) अन्नधान्य आणि खाद्यान्नाच्या किंमती वाढणार आहेत. दैनंदिन वापरातील या वस्तू महाग झाल्याने त्याचा आर्थिक बोजा थेट ग्राहकांवर पडणार आहे. ग्राहकांना पॅकड, सीलबंद, लेबल लावलेल्या अनेक रोजच्या वापरातील वस्तूंसाठी जादा दाम(GST Rate News) मोजावे लागतील. यामध्ये दही, ताक, पनीर, पीट, सोयाबीन, मटार, गहु आणि अन्य धान्य महाग होणार आहे. या सर्वांवर आता 5 टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे.

 

 

Published on: Jul 18, 2022 10:36 AM